शालेय उपक्रम

                                                           
                            शालेय उपक्रम
          (वाचक मित्रांनी आपले उपक्रम सांगावेत ) 
                                                     crcmhaswadno3@gmail.com                   ७५८८६११०१५ 

                               

१) अभिव्यक्ती -
                                 दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही  सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल.
उदा. पाऊस -  १) मला पाऊस  आवडतो.     २) माझी  आई पावसाचे गाणे म्हणते . इ.


२) नवीन इंग्रजी शब्द -
                                     दररोज परिपाठात नवीन दोन इंग्रजी शब्द सांगावेत व वंदे मात्रमाच्या च्या वेळेस तेच शब्द विचारावेत .उत्तर देणा-याचे अभिनंदन करावे.

३) गाण्यातून शिक्षण -
                                     कला विष यासाठी  आपण बडबड गीते घेतो त्यातीलच जोडशब्द मुलांना लिहिण्यास  सागितले तर मुले खूप आवडीने लिहितात.त्यातून वाचन -लेखन प्रकल्प लवकरच यशस्वी होतो .

४) दिनाकानुसार पाढे -
                                        मुलांना पाध्ये खूप कठीण वाटतात त्यासाठी परिपाठात आजचा जो दिनांक असेल त्या दिनाकाचा पाढा पाठ करण्यास सांगावे. उद. ५ दि. असेल तर ५ चा पाढा अशाप्रकारे लवकरात लवकर पाध्ये पाठांतर होऊ शकते .

५) मुलाखत -
                   महिन्यात पहिल्या व तिस-या गुरुवारी मुलांच्या मुलाखती घेव्यात .म्हणजे त्यांचा अत्मविश्वास वाढेल .साध्या व सोप्या प्रश्नांनी सुरुवात केली कि मग अभ्यासाचे प्रश्न विचारावेत ,मुले फटाफट उत्तरे देतात .काही दिवसानंतर मुलांना एकमेकांची मुलाखत घ्यायला लावायची .म्हणजे भविष्यात वार्ताहर, बातमीदार याची पायाभरणी होईल.अभ्यासाचा साराव घेण्यास अतिशय उपायुक्त उपक्रम आहे. 

६) हसत -खेळत -
                    हा टीव्हीवरील  चालता बोलता उपाक्रमा सारखाच आहे. मुलांना प्रश्न विचारावेत पहिला बरोबर दिला कि त्यालाच दुसारा व तोही बरोबर उत्तर सांगीतले कि तिसरा त्यालाच विचारावा . जो तीनही उत्तरे बरोबर देईल त्याला एक चाकलेट द्यावे. अशाने  अभ्यास ही होतो व जनरल ज्ञानात ही भर पडते .


७ ) माझ्या शाळेतील मुलींचे नाटक

) एकपात्री नाटक  

९ )  विध्यार्थी भाषण 

10) बेरेजेचा गेम