Tab School



विजयनगर माण तालुक्यातील १०० टक्के TAb युक्त पहिली शाळा .
विजयनगर शाळेची मुले झाली Tab सम्राट .
गुजरातच्या अतुल फौंडेशन च्या csr मधून  विजयनगर शाळेला tab.
           आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल हे  प्रत्येकाने स्वीकार करणे अपेक्षित आहे या उक्तीप्रमाणे सह्याद्री पर्वत्तातील महादेवाच्या डोंगरावर असणारे पर्यंती हे छोटेस गाव आणि विजयनगर ही पर्यंची वस्ती या विजयनगर च्या जिल्हा परिषद शाळेत गुजरात च्या अतुल फौंडेशन ने १०० टक्के विद्यार्थ्यांना tab देवून त्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले आहे.आणि या कर्यक्रमासाठी खास उद्घाटक म्हणून लाभले ते राज्याचे शिक्षण संचालक म श्री दिनकर पाटील साहेब यांच्या हस्ते दिनांक ९ एप्रिल मंगळवार रोजी विजयनगर शाळेत tab वितरण समारोह पार पडला.
                 या शाळेतील मुख्याध्यापक भोजा काळेल आणि गुगल इनोव्हेटर असणारे बालाजी जाधव या दोन शिक्षकांनी वर्षे भारत राबवलेले विविध असे अभिनव प्रयोग त्याची एक सक्सेस स्टोरी बनवून अनेक संस्था, फौंडेशन यांना पाठवली होती त्यापैकी अतुल फौंडेशन अतुल जिल्हा वल्साड ,गुजरात या फौंडेशन ने शाळेतील १५ मुलांना tab देवून माण तालुक्यातील १०० टक्के tab असणारी पहिली शाळा होण्याचा माण विजयनगरच्या शाळेला मिळाला आहे.
         सदर कर्यक्रमास खास पुण्याहून आलेले शिक्षण संचालक म श्री दिनकर पाटील साहेब यांनी बोलताना सांगितले की समाजात मदत करणे पुष्कळ लोक आहेत आपण विधायक आणि अभिनव काम घेवून त्यांच्या पर्यंत पोहचलो की आपणास ही अशी मदत मिळू शकते जशी बालाजी जाधव यांनी त्यांच्या शाळेला मिळवली आहे. त्यांनी स्वता मुलाच्या जवळ जावून मुले tab कसा हाताळत आहेत हे पहिले, मुले गणित, इंग्रजी आगदी सहज पणे अभ्यास करताना पाहून मळा समधान वाटले असे मत व्यक्त केले.अत्यंत दुष्काळ म्हणजे पिण्यास पाणी ण मिळणारा भाग मात्र या tab च्या माध्यमाने शिक्षणाला एक नव संजीवनी मिळाली असे उद्गार त्यांनी काढून शाळेच्या कामाचे खूप खूप कौतुक केले. सर्व शिक्षकांनी काळाबरोबर अपडेट रहावे आणि आपल्या दैनंदिन कामात कौशल्याचा चांगला वापर करावा असा मोलाचा सल्ला ही त्यांनी दिला.
                 सादर कार्यक्रमास निर्भीड  फौंडेशन म्हसवड चे अध्यक्ष डॉ चेतन गलंडे हे ही उपस्थित होते त्यांनी ग्रामीण भागात विजयनगर शाळेतील सर्व उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले आणि आम्हीसुद्धा या प्रमाणे शाळा साठी साह्य करू असे अभिवचन दिले. माण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते यांनी ही मनोगतात आमच्या तालुक्यात बाहेरच्या राज्यातून csr मिळवून tab प्राप्त केल्याबदल बालाजी जाधव व भोज काळेल यांचे विशेष कौतुक केले, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी आजचे युग त्या शिक्षणात होणारे बदल समजून घ्या व स्वता ल त्याप्रमाणे कसे अपडेट करता येईल यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत करावे आणि विजयनगर शालेसारखे अभिनव उपक्रम राबवून आपली शाळा सुद्धा जागतिक दर्जाची बनवण्यासाठी पर्यटन करावे असे आव्हान केले. केंद्रप्रमुख बाळासो पवार यांनी शाळेच्या कामावर खुश होत केंद्रातील सर्व शाळा अशा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास म्हसवड चे केंद्र प्रमुख जगन्नाथ विरकर, केंद्रप्रमुख आवळे साहेब, इंजबाव केंद्रातील सर्व शाळांचे सर्व शिक्षक, पंचायत समिती विषय तज्ञ ,साधन व्यक्ती इ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरिता काळेल यांनी केले.
         माण च्या दुष्काळ असना-या भागात या अतुल फौंडेशन ने केलेल्या मदतीने शिक्षणात खूप मोठे बदल होणे अपेक्षित आहे आणि त्याची सुरुवात विजयनगर शाळेत होतीय ही अतिशय आनंदाची बाब आहे. इतक्या दुर्गम भागात एकदम छोट्या शाळेत राज्यचे शिक्षण संचालक येतात ही बाबा अतिशय समाधान आणि आमच्या सारख्या धडपडणा –या शिक्षकांना नेहमीच प्रेरणा देणारे ठरणार आहे आणि प्रत्येक मुलगा स्वता आता tab च्या साह्याने जगभरातील कोणत्याही शालेसोबत व्हर्च्युल कनेक्ट होवून अशा ग्रामीण भागात ग्लोबल एज्युकेशन देण्याची संधी मला  बदलीने  मिळलेल्या शाळेत हे सर्व करण्याची संधी अगदी १ वर्षाच्या आत मिळती हे माझासाठी आनंदाची बाब असल्यचे मत प्रास्ताविकात global टीचर बालाजी जाधव यांनी केला आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे मळा हे करणे शक्य झाल्याचे मत बालाजी जाधव यांनी व्यक्त करून तालुका, जिल्हा व राज्यातील शिक्षकांना आमच्या शाळेत येवून कशी मुले tab द्वारे सहज व मनोरंजक शिक्षण घेवू शकतात हे पाह्यच असेल तर विजयनगर शाळेला भेट नक्की द्या.
अधिक माहितीसाठी www.shikshanbhkti.in