नवीन शैक्षणिक वर्षात .....

नवीन शैक्षणिक वर्षात ......
                                 crcmhaswadno3.blogspot.in  ही शैक्षणिक लिंक चालू वर्षात सुरु झालेली आहे आपण सर्वांनी भरभरून दिलेला पाठींबा ,सहकार्य, प्रेम या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात ही लिंक खूपच कमी कालावधीत सर्वत्र  पोहचली, पण खरं आव्हान आहे ते येणा-या शैक्षणिक वर्षाचं .या शैक्षणिक वर्षात मी आपल्यासमोर थोडसं नियोजनपूर्वक काही बाबी देण्याचा प्रयत्न करणार आहे .आणखी आपल्या नाविन सूचना कळवाव्यात .पुढील शैक्षणिक वर्षात आपणास खालील बाबी निश्चितपणे प्राप्त होतील .

१) इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे दिनांकानुसार वार्षिक नियोजन दिले जाईल.

२) साप्ताहिक  Online  व  Offline  अशा दोन्ही टेस्ट दिल्या जातील.

३) सर्व विषयाचे वार्षिक नियोजन व साप्ताहिक नियोजन दिले जाईल.

४) १ ते ४ च्या सर्व विषयाच्या सर्व घटकावर चित्ररूप, तर्करूप ,शिष्यवृत्ती वर आधारित गृहपाठ दिले जातील.

५) वार्षिक नियोजनानुसार घटकावार स्वाध्याय, गृहपाठ  'गृहपाठ' या नवीन पानावर मिळतील.

६) डिसेंबर पर्यंत ४ थी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर नियोजनानुसार साप्ताहिक ,पाक्षिक, व मासिक अशा 
      Online  व जेथे शक्य नाही त्यांच्यासाठी  Offline म्हणजे प्रिंट निघतील अशा टेस्ट दिल्या जातील.

७) कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण याचे विविध उपक्रम वेळच्या वेळी दिले जातील.

८) सर्व विषयाच्या अद्यावत प्रश्नपेढ्या दिल्या जातील.

९) आपल्या सर्वांच्या सुचनेनुसार  आणखी बा-याच बाबी दिल्या जातील.

१०) सर्वात महत्त्वाचे वरील सर्व आपणास अगदी मोफत मिळेल.
                                                                 
                                                                                                          धन्यवाद