Best Resource


"ऑफलाईन अनिमेटेड फ्लीपबुक" देशातील सर्वोत्तम रिसोर्स,
I got "National Most Innovative Educationsit Award 2019" For My Flipbook @ 5 star Radisson Blu Hotel Delhi. I am very Happy to take this award by Formar Indian Cricketer Mr. Madanlal Sharma. IIT Delhi, Google India, Delhi University also Invited me for my Project and I am very Happy to present my project these all reputed Institution's in India.I am very Happy for this Award From # SDF International Delhi#.


 




1) Tital -  Animated Offline Flipbook
2)Rationale
                              एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होताना दिसत आहेत,शिक्षण क्षेत्र तरी यापासून कसे दूर राहील.शिक्षणात सुरुवातीला कागदी रंगीत कार्ड वापरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असत.त्यात सुधारणा होऊन काही प्रतिकृती बनवून अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न उपक्रमशील शिक्षकांनी केला.हळूहळू या सर्व साधनांची जागा तंत्रज्ञान घेवू लागले.त्यामध्ये पीपीटी, व्हिडिओ,ऑडीओ यासारख्या साधनांचा वापर करून अध्ययन अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.सोबतच काही शिक्षक स्वताचे ब्लॉग ,वेबसाईट बनवून इतरांना मदत करू लागले तसेच काही अभिनव शिक्षकांनी android अप्प्स सुद्धा बनवून शिक्षणात एक प्रगतीचे पाऊल टाकले.सोबतच मूल्यमापनासाठी ऑनलाईन ,ऑफलाईन टेस्ट आल्या त्यानंतर अलीकडे शासनाने सुद्धा सर्व पुस्तकात क्यू आर कोड च्या मदतीने अध्यापनात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.यासाठी इंटरनेट ची आवश्यकता आसते.मात्र शिक्षणातील एक नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे अनिमेटेड फ्लिपबुकहोय.
3)Objectives or What is my Innovation          
                        काय आहे अनिमेटेड फ्लीपबुक तर एखादं पीडीएफ पुस्तक फ्लिप बुक मध्ये घेवून त्याची पाने सहजपणे हाताने पुढे मागे करता येतात असे हे फ्लिपबुक असते.मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शिक्षकांने त्याच फ्लिप बुकला जिवंत करण्याचा शोध लावला आहे.म्हणजे ते समान्य फ्लीपबुक प्रमाणे तर पाने पालटता येतील मात्र जो पाठ तुमच्या समोर येईल त्या पाठाचा व्हिडिओ तिथेच एका क्लिक वर सुरु होईल.पूर्वी कुठल्या तरी वेबसाईट वर जाऊन तो व्हिडिओ शोधावा लागायचा आता मात्र या Animated फ्लीपबुक मध्ये व्हिडिओ साठी क्लिक कराअसा पर्याय दिला आहे त्यावर क्लिक केले की त्या पाठचा व्हिडिओ तिथेच अगदी काही सेकंदात सहज सुरु होतो आणि त्यासाठी इंटरनेटची सुद्धा आवश्यकता नाही हि बाब सर्वात महत्वाची आहे.शिक्षक याचा वापर अध्यापनासाठी करू शकतात सोबतच विद्यार्थी त्यानंतर न समजलेला भाग समजवून घेण्यासाठी याचा वापर कधीही करू शकतात.हे पहिले वैशिष्ट्ये अगदी महत्त्वाचे आहे.
                                                याचे दुसरे विशेष म्हणजे  आपल्या समोर जो घटक येईल मग तो पाठ असो अथवा कविता असो त्याचा  ऑडीओ ही ऐकता येईल. त्या पुस्तकात एक ऑडीओ साठीचे चित्र दिलेले आहे.त्यावरून हवं आहे तेंव्हा ऑडीओ सुरु करू शकता हवं आहे तेंव्हा बंद करू शकता.म्हणजे अगदी अंध विद्यार्थी असतील तरी ऑडीओ द्वारे ते सहज श्रवण करू शकतात. यामुळे कविता ज्या पानावर आहे त्याच पानावर ती सुंदर आवाजात तुम्हाला  ऐकायला मिळणार आहे.मग नुसते पाठ आणि कविताच नाही तर गणित,इंग्रजी या विषयातील सूचना ,स्पष्टीकरण याचेही ऑडीओ यामध्ये असणार आहेत.
               या Animated फ्लिपबुक मधील तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्याच पानावर खालच्या बाजूला स्वध्यासाठी क्लिक कराअसा पर्याय दिसेल  त्यावर क्लिक करता क्षणी त्या  घटकावर आधारित सरावासाठी एक प्रश्नसंच सुद्धा तिथे देण्यात आला आहे.त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असून योग्य उत्तरला क्लिक करायचे आहे आणि त्याचा निकालही तेथेच दिसतो. म्हणजे तुम्ही दिलेले उत्तर चूक आहे की बरोबर हे तिथेच तुम्हाला समजते व शेवटी एकूण किती प्रश्न बरोबर आले व त्याची टक्केवारी हि तिथे दिसते आणि जर तुम्हाला त्या सरावसंचाचा पुन्हा सराव करायचा असेल तर करू शकता.या पूर्वी असा सराव संच सोडवण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असायची मात्र आता येथे आवश्यक नाही.हे विशेष आहे.म्हणजे मूल्यमापन सुद्धा सहज करता येवू शकते.
                  सोबतच नुसते व्हिडिओ पाहणे, ऑडीओ ऐकणे, प्रश्नांचा सराव करणे एवढेच नसून पाठ्यपुस्तकातील रिकाम्या जागा, जोड्या लावा, आकृत्या काढा ,चित्रे रेखाटा या सर्व गोष्टी विविध रंग वापरून माउसने संगणकावर, स्मार्ट बोर्ड असल्यास तर आगदी हाताने या सर्व बाबी करता येवू शकतात. tab व मोबाईल वर सुद्धा सहज करता येतात. म्हणजे स्क्रीनवर पुस्तकाची पाने पालटली जातात त्या प्रत्येक पानावर क्लिक केले की तुमच्या समोर व्हिडिओ,ऑडीओ, स्वाध्याय, आणि कृती हाताने रेखाटणे या सर्व बाबी या पुस्तकात करता येवू शकतात. प्रत्यक्ष पुस्तकावर कृती करायच्या म्हणजे लिहायचे म्हंटले तर एक वेळा आपण लिहू शकतो मात्र या Animated फ्लिपबुकमध्ये इपिक पेनया टूल च्या साह्याने आपण कितीही वेळा एखादे चित्र रेखाटू शकतो, गणिते सोडवू शकतो, जोड्या लावू शकतो आणि एका क्लिक वर ते साफ सुद्धा करता येते.म्हणजे अगदी दररोज याचा सराव करता येवू शकतो.
                                           या सर्व साधानासोबत मुलांची मनोरंजकता वाढावी,लक्षे केंद्रित राहावे यासाठी त्या पाठावर आधारित असणारे चित्र जे पुस्तकात नसतील मात्र ज्याचा उल्लेख किंवा नवे आली असतील अशा चित्रांचा एक छोट्या आकाराचा स्लाईड शो प्रत्येक पानावर समाविष्ट केला आहे.जेणेकरून त्या शब्दांचा त्या चित्रावरून सहज बोध,संकल्पना स्पष्ट व्हावी हा मुख्य हेतू आहे.त्यामध्ये त्या सर्व इमेजेस अनिमेशन मध्ये सुरु राहतात .
                  यापूर्वी या सर्व बाबी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधाव्या लागायच्या म्हणजे त्या पाठचा व्हिडिओ कुठल्यातरी वेबसाईट वरून शोधावा लागायचा.स्वाध्याया साठी कोठे तरी ऑनलाईन टेस्ट शोधाव्या लागायच्या. रेखाटणे सारख्या क्रिया पाटीवर,वहीवर किंवा इतरत्र कराव्या लागायच्या मात्र आता या सर्व समस्या सोडवून हे एकाच जागी सहज आपल्याला अशा फ्लिपबुक मधून वापरावयास मिळू शकतात त्यामुळे बदलत्या जगासोबत आपण आपल्या अध्यापनात आणि अध्ययनात अशा बदलांचा स्वीकार करून कमी वेळेत अधिक परिणामकारकता आपणास मिळावी यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात करायला हवी.
4)Methodology proposed to be adopted
                                      शिक्षकांच शिकवण आणि शिकणं सोप्प व्हावं यासाठी हा प्रयोग मी माझ्या शाळेत राबवला आणि मग आजूबाजूच्या शाळांना माहिती झाला त्यानंतर हि पद्धत माझ्या केंद्रात,बीट मध्ये सोबतच तालुक्याला हि माहित झाली व खूप  सा-या शाळांनी याचा वापर सुरु केला व आमच्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा मध्य वापरण्याचे आवाहन केले आणि त्या प्रमाणे वितरीत करून जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यात आज यशस्वीपणे फ्लीप्बुकाचा वापर केल्याने शिकवणे व शिकणे सोपे झाले आहे.
5)Expected outcomes and educational implications
                            सदरील ऑफलाईन फ्लीपबुक वापर सुरु केल्यामुळे खूप कमी वेळेत शिक्षक एखादा घटक, क्रिया सहजपणे शिकवू लागले, दैनंदिन अध्यापनात मनोरंजकही होवू लागले, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना काही समजले नसल्यास ते पुन्हा फ्लीपबुक च्या मदतीने सहज शिकू लागले.यामुळे कमी वेळेत शिक्षकांनी शिकवण्याचे काम सहज होवू लागले, विद्यर्थ्यामच्या शिकण्यात गती आली सोबतच परीक्षेचे तयारी सहजपणे होवू लागली, मूल्यमापन सहजपणे ताबडतोब करणे शक्य झाले त्यामुळे मुले मनोरंजन पद्धतीने शिकू लागली.विद्यर्थ्याना गणित ,इंग्रजी सारख्या विषयात अपेक्षित पातळी अगदी कमी वेळेत गाठणे इंटर नेट शिवाय शक्य असल्याने कितीही वेळा त्यावर सराव करण्यात मुले आनंदाने सहभागी होवू लागले. शिक्षकांनी मूल्यमापन सहज आणि स्पष्ट झाल्याने अगदी मनापासून आवडू लागले.
6)Time required for the completion of project (in months)
        मागील वर्षभरात मी ७ महिने एवढा वेळ १ ते ४ च्या सर्व विषयांचे फ्लीपबुक बनवण्यासाठी वेळ लागला आहे आणि त्यातून हे निर्मिती करून माझ्या शाळेत सोबतच आमच्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये याचा वापर होत असून नुकताच या वर्षी पासून सुरु झालेल्या पुणे विभागीय गुणवत्ता विकास कार्यक्रमात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ,पुणे  या ५ जिल्यातील बहुतांश शाळांमध्ये हे फ्लीपबुक पोहचले आहे.
       Summry      अशा प्रकारे इंटरनेट शिवाय सहज वापरता येण्यासारखा हा प्रोजेक्ट असून देशाच्या ग्रामीण भागात याचा जास्तीत जास्त वापर होवू शकतो.अशा या नाविन्यपूर्ण बदलांचा  संपूर्ण शिक्षण क्षेत्राने स्वीकार करून त्याचा वापर करण्याची सुरुवात करायला हवी.
                 
             
बालाजी बाबुराव जाधव जि..प्राथ शाळा विजयनगर ता. माण जि. सातारा ७५८८६११०१५