मुले झाली किल्लेदार







मुले झाली किल्लेदार .....
                  सर मग एवढा मोठा किल्ला कसा बांधत असतील हो ? असा प्रश्न माझ्या वर्गातील मुलांनी मला विचारला, मी इयत्ता ४ था चा वर्गशिक्षक आहे. इतिहासात  किल्ल्यांचा उल्लेख वारंवार येतो मग त्याच्या निर्मिती बद्दल मुलांना आणि आम्हाला मोठी उत्सुकता लागली त्याबद्ल गुगलवर काही माहिती आम्हाला भेटली मात्र प्राजक्ता म्हणाली, सर आपण पण बनवूया की किल्ला !!! कसा, काय काय करावे लागेल, साहित्य काय, वेळ किती लागेल,जागा कोठे,वस्तू कशा जमवायच्या  या सर्व बाबींचे गणित आम्ही जुळवले आणि बस्स ठरले कि किल्ला बनवायचाच. 
                        शाळा अगदी सह्याद्रीच्या डोंगरावर उंचावर त्यामुळे सर्वत्र माळरान पडीक मोकळी जमीन, मी म्हणालो की भरपूर दगड लागतील तर प्रत्येक मुलांनी छोट्या सुट्टीत आणि मोठ्या सुट्टीत काही दगड परिसरातून जमवायचे ,तास बुडवून हे करायचे नाही आणि उरलेले काम कार्यानुभवाच्या तासिकेत मार्गी लावायचे ठरले.अगदी ८ ते १० दिवसात ४ थी च्या विद्यार्थ्यांनी आवश्यक दगड गोळा केले.मग त्यासाठी लागणारी माती अमाच्या आजूबाजूला मिश्र प्रकारची माती मग मुले म्हणाली सर आपण धान्य चाळतो ना त्याची चाळणी आणून माती चाळूया आणि दुपारी जेवणानंतर माती चाळण्याचा आमचा उद्योग सुरु झाला.२ ते ३ दिवसात आम्ही माती जमवून चाळून घेतली.त्यासाठी जुनी बारादाण्याची पोती लागणार होती काही मुलांनी घराची जुनी पोते आणली त्याचे विशिष्ट भाग केले.आता किल्ला बनवायचा कोठे ? एक जागा ठरवली जी योग्य होती,प्रश्न होता तो पाण्याचा ,प्रचंड दुष्काळ असलेला हा भाग पाण्याचा दुष्काळ तरीही प्रत्येक मुलांने आपापल्या घरून दररोज १ बाटली आणण्या ऐवजी २ बाटल्या आणायच्या  आणि शाळेतील पिंपात ५ ते ६ दिवस पाणी साठवले.मात्र एवढ्यात काही पाण्याचे आमचे जमेना शेवटी आशिषने सांगितले की आमच्या रस्त्यावर एक हापसा (हातपंप) आहे पण त्याला क्वचितच पाणी येते आणि ठरले मग तेथून पाणी आणायचे आणि त्याच्याच बाजूला काळी माती असलेले एकच शेत होते त्यांना विनंती करून पोत्यात मातीही तेथूनच आणली.एकंदरीत आवश्यक वस्तू जमवल्या आता वेळ होती प्रत्यक्ष वास्तू बनवण्याची.
                              किल्ला निर्मितीचा दिवस ठरला आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करण्याचे ठरले कारण सर्व गोष्टी खूप कष्टातून मिळवल्या होत्या.मग प्रत्येकाला चिखल करावासा वाटू लागला मग कामाची विभागणी करून काही मुलांनी दगड मांडावे, काहीजण मातीचा चिखल करतील ,काही मुले जुन्या विटांची तटभिंत करतील अशी काम विभागणी सुरु झाली.दगड मांडले कि चित्रातील किल्ल्याप्रमाणे आकार काही दिसेना किती तरी वेळा दगड बाजूला सारून पुन्हा पुन्हा मांडणी केली.मुले मग प्रश्न विचारू लागले शिवरायांच्या काळात हे सर्व साहित्य कसे जमा करत असतील, इतक्या उंचावर कसे घेवून जात असतील? याची त्यांना जाणीव होऊ लागली.मग दगड मांडणी कशी तरी पूर्ण झाली आणि बराच वेळ गेल्याने चिखलाचं काम अपूर्णच राहिलं. तो तसाच ठेवून शाळा सुटली.दुस-या दिवशी येवून पहिले तर सर्व विस्कळीत झाले होते.सार्वजन हिरमुसले मी गाडीतून उतरेपर्यंत सर्व मुलांचा घोळका माझ्या गाडीभोवती सर आपला किल्ला मोडला  आता काय करायचे?मग मी म्हणालो किल्ला मोडला ? कोणी मोडला ? माहित नाही सर ,मोठी मुले इकडे व्यायामाला येतात त्यांनी मोडला असेल .मग सुरजने प्रश्न विचारला मग शिवरायांच्या काळात पण किल्ले मोडत असत का ?मी म्हणालो धोका तर होताच पण त्याच्या रक्षणासाठी त्यांनी पहारेकरी ठेवले होते.मग मुले म्हणाली आपण पण ठेवूया, मी शक्य नाही म्हणालो,मुले म्हणाले दररोज २ मुले यांची जबाबदारी घेतील असे ठरले.
                              दुस-या दिवशी दगडावर माती टाकून त्यावर बारादाण्याची पोते टाकून चिखलाचे  वेगवेगळया आकाराचे गोळे लिंपणे सुरु झाले.प्रत्येकजण आपल्या परीने काम करत होता.निर्मितीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.किल्ल्याच्या पायथ्याला एक तलाव बनवला पाणी जमिनीत जावू नये म्हणून प्लास्टिक कागद खाली टाकून त्याला मातीने वरच्या बाजुला लिंपून मग त्यात पाणी टाकले. भुयारे केली, बुरुज करताना कितीतरी वेळा पडायचा मग पुन्हा बनवायचो, तोफांची जागा बनवली. किल्यावर जाण्याच्या ३ वाटा बनवल्या. पहारेक-या च्या जागा बनवल्या. वर सपाट भाग करून राजमहाल. दरबार, बाजार, घरे, मंदिर या सर्व बाबी बनवून घेतल्या शेवटी तटबंदी साठी माती कमी पडू लागली पुन्हा काम थांबले मग दुस-या दिवशी ते काम पूर्ण झाले.
                                    किल्ला पुर्णत्वा कडे जात असताना त्यावर काळी माती टाकून त्यात धान्य टाकले माती दुरून गाडीवर जावून पोत्यात आणली,४ दिवसांनी त्या माती हिरवेगार धान्य उगवून आले,शिवरायांची मूर्ती वरच्या बाजूला बसवली बाजारातून सैनीक विकत आणले जागोजागी सैनिक ,प्राणी, जलचर प्राणी तलावात सोडले, वाघ, हत्ती, सिंह जंगलात उभे केले. आता किल्ल्याला ४ दिवसानंतर रंग देण्याचे  काम सुरु केले विविध रंगातील रंगीत किल्ला  पाहण्यासारखा झाला.
                              आता किल्याच्या रक्षणासाठी मुले सूर्यास्ता वेळी आणि सुर्यदया वेळी शाळेत येवून रक्षण करू लागले. यामुळे मुलांना वाटायल लागले एवढा छोटा किल्ला बनवायला एवढे कष्ट लागत असल्यास शिवरायांनी हे सर्व कसे केले असेल? आपण त्याची जपणूक करावी असे मुलांना स्वात: वाटायला लागाले.एकत्रित काम केल्याने एकता हा गुण त्यांच्यात आपोआप निर्माण झाला.निर्मिती बद्दल काष्टा बद्दल त्यांना जाणीव झाली, रक्षण काय असते हे माहित झाले,सर्व प्रकारची मूल्य आपोआप रुजू लागली. यामुळे उद्याचे चांगले अभियंते निर्माण होतील,पुढच्या पिढीला आपला इतिहास ,संस्कृती याचा वसा जोपासण्याचा मार्ग दाखवतील.आज सर्वजन अभिमानाने सांगतात मी किल्ला बनवला त्याचे रक्षण मी करणार, आम्ही किल्लेदार आहोत. आम्ही शिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहोत खरे किल्लेदार आमचे विद्यार्थी आहेत.

                                                बालाजी बाबुराव जाधव
                                          उपशिक्षक,जि.प. प्राथ शाळा विजयनगर 
                                          ता. माण जि . सातारा ७५८८६११०१५

Animated Flipbook

एक आनंदवार्ता !!! माझ्या 'Animated Flipbook' या प्रोजेक्टची " Iconic Indian Brand Award 2018@ New Delhi" या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.१ सप्टेंबर ला दिल्लीत होणार सन्मान.काय आहे 'Animated Flipbook' ,शिक्षणातील बदलता प्रवाह हे या व्हिडीओतून जाणून घ्या आणि प्रतिक्रिया जरूर कळवा.










Animated Flipbook
               एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होताना दिसत आहेत,शिक्षण क्षेत्र तरी यापासून कसे दूर राहील.शिक्षणात सुरुवातीला कागदी रंगीत कार्ड वापरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असत.त्यात सुधारणा होऊन काही प्रतिकृती बनवून अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न उपक्रमशील शिक्षकांनी केला.हळूहळू या सर्व साधनांची जागा तंत्रज्ञान घेवू लागले.त्यामध्ये पीपीटी, व्हिडिओ,ऑडीओ यासारख्या साधनांचा वापर करून अध्ययन अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.सोबतच काही शिक्षक स्वताचे ब्लॉग ,वेबसाईट बनवून इतरांना मदत करू लागले तसेच काही अभिनव शिक्षकांनी android अप्प्स सुद्धा बनवून शिक्षणात एक प्रगतीचे पाऊल टाकले.सोबतच मूल्यमापनासाठी ऑनलाईन ,ऑफलाईन टेस्ट आल्या त्यानंतर अलीकडे शासनाने सुद्धा सर्व पुस्तकात क्यू आर कोड च्या मदतीने अध्यापनात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.यासाठी इंटरनेट ची आवश्यकता आसते.मात्र शिक्षणातील एक नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे ‘अनिमेटेड फ्लिपबुक’ होय.
                        काय आहे ‘अनिमेटेड फ्लीपबुक’  तर एखादं पीडीएफ पुस्तक फ्लिप बुक मध्ये घेवून त्याची पाने सहजपणे हाताने पुढे मागे करता येतात असे हे फ्लिपबुक असते.मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शिक्षकांने त्याच फ्लिप बुकला जिवंत करण्याचा शोध लावला आहे.म्हणजे ते समान्य फ्लीपबुक प्रमाणे तर पाने पालटता येतील मात्र जो पाठ तुमच्या समोर येईल त्या पाठाचा व्हिडिओ तिथेच एका क्लिक वर सुरु होईल.पूर्वी कुठल्या तरी वेबसाईट वर जाऊन तो व्हिडिओ शोधावा लागायचा आता मात्र या Animated फ्लीपबुक मध्ये ‘व्हिडिओ साठी क्लिक करा’ असा पर्याय दिला आहे त्यावर क्लिक केले की त्या पाठचा व्हिडिओ तिथेच अगदी काही सेकंदात सहज सुरु होतो आणि त्यासाठी इंटरनेटची सुद्धा आवश्यकता नाही हि बाब सर्वात महत्वाची आहे.शिक्षक याचा वापर अध्यापनासाठी करू शकतात सोबतच विद्यार्थी त्यानंतर न समजलेला भाग समजवून घेण्यासाठी याचा वापर कधीही करू शकतात.हे पहिले वैशिष्ट्ये अगदी महत्त्वाचे आहे.
                        याचे दुसरे विशेष म्हणजे  आपल्या समोर जो घटक येईल मग तो पाठ असो अथवा कविता असो त्याचा  ऑडीओ ही ऐकता येईल. त्या पुस्तकात एक ऑडीओ साठीचे चित्र दिलेले आहे.त्यावरून हवं आहे तेंव्हा ऑडीओ सुरु करू शकता हवं आहे तेंव्हा बंद करू शकता.म्हणजे अगदी अंध विद्यार्थी असतील तरी ऑडीओ द्वारे ते सहज श्रवण करू शकतात. यामुळे कविता ज्या पानावर आहे त्याच पानावर ती सुंदर आवाजात तुम्हाला  ऐकायला मिळणार आहे.मग नुसते पाठ आणि कविताच नाही तर गणित,इंग्रजी या विषयातील सूचना ,स्पष्टीकरण याचेही ऑडीओ यामध्ये असणार आहेत.
               या Animated फ्लिपबुक मधील तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्याच पानावर खालच्या बाजूला ‘स्वध्यासाठी क्लिक करा’ असा पर्याय दिसेल  त्यावर क्लिक करता क्षणी त्या  घटकावर आधारित सरावासाठी एक प्रश्नसंच सुद्धा तिथे देण्यात आला आहे.त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असून योग्य उत्तरला क्लिक करायचे आहे आणि त्याचा निकालही तेथेच दिसतो. म्हणजे तुम्ही दिलेले उत्तर चूक आहे की बरोबर हे तिथेच तुम्हाला समजते व शेवटी एकूण किती प्रश्न बरोबर आले व त्याची टक्केवारी हि तिथे दिसते आणि जर तुम्हाला त्या सरावसंचाचा पुन्हा सराव करायचा असेल तर करू शकता.या पूर्वी असा सराव संच सोडवण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असायची मात्र आता येथे आवश्यक नाही.हे विशेष आहे.म्हणजे मूल्यमापन सुद्धा सहज करता येवू शकते.
                  सोबतच नुसते व्हिडिओ पाहणे, ऑडीओ ऐकणे, प्रश्नांचा सराव करणे एवढेच नसून पाठ्यपुस्तकातील रिकाम्या जागा, जोड्या लावा, आकृत्या काढा ,चित्रे रेखाटा या सर्व गोष्टी विविध रंग वापरून माउसने संगणकावर, स्मार्ट बोर्ड असल्यास तर आगदी हाताने या सर्व बाबी करता येवू शकतात. tab व मोबाईल वर सुद्धा सहज करता येतात. म्हणजे स्क्रीनवर पुस्तकाची पाने पालटली जातात त्या प्रत्येक पानावर क्लिक केले की तुमच्या समोर व्हिडिओ,ऑडीओ, स्वाध्याय, आणि कृती हाताने रेखाटणे या सर्व बाबी या पुस्तकात करता येवू शकतात. प्रत्यक्ष पुस्तकावर कृती करायच्या म्हणजे लिहायचे म्हंटले तर एक वेळा आपण लिहू शकतो मात्र या Animated फ्लिपबुकमध्ये ‘इपिक पेन’ या टूल च्या साह्याने आपण कितीही वेळा एखादे चित्र रेखाटू शकतो, गणिते सोडवू शकतो, जोड्या लावू शकतो आणि एका क्लिक वर ते साफ सुद्धा करता येते.म्हणजे अगदी दररोज याचा सराव करता येवू शकतो.
                                           या सर्व साधानासोबत मुलांची मनोरंजकता वाढावी,लक्षे केंद्रित राहावे यासाठी त्या पाठावर आधारित असणारे चित्र जे पुस्तकात नसतील मात्र ज्याचा उल्लेख किंवा नवे आली असतील अशा चित्रांचा एक छोट्या आकाराचा स्लाईड शो प्रत्येक पानावर समाविष्ट केला आहे.जेणेकरून त्या शब्दांचा त्या चित्रावरून सहज बोध,संकल्पना स्पष्ट व्हावी हा मुख्य हेतू आहे.त्यामध्ये त्या सर्व इमेजेस अनिमेशन मध्ये सुरु राहतात .
                  यापूर्वी या सर्व बाबी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधाव्या लागायच्या म्हणजे त्या पाठचा व्हिडिओ कुठल्यातरी वेबसाईट वरून शोधावा लागायचा.स्वाध्याया साठी कोठे तरी ऑनलाईन टेस्ट शोधाव्या लागायच्या. रेखाटणे सारख्या क्रिया पाटीवर,वहीवर किंवा इतरत्र कराव्या लागायच्या मात्र आता या सर्व समस्या सोडवून हे एकाच जागी सहज आपल्याला अशा फ्लिपबुक मधून वापरावयास मिळू शकतात त्यामुळे बदलत्या जगासोबत आपण आपल्या अध्यापनात आणि अध्ययनात अशा बदलांचा स्वीकार करून कमी वेळेत अधिक परिणामकारकता आपणास मिळावी यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात करायला हवी.
             अशा प्रकारे इंटरनेट शिवाय सहज वापरता येण्यासारखा हा प्रोजेक्ट असून देशाच्या ग्रामीण भागात याचा जास्तीत जास्त वापर होवू शकतो.अशा या नाविन्यपूर्ण बदलांचा  संपूर्ण शिक्षण क्षेत्राने स्वीकार करून त्याचा वापर करण्याची सुरुवात करायला हवी.
                 
             
बालाजी बाबुराव जाधव जि.प.प्राथ शाळा विजयनगर ता. माण जि. सातारा ७५८८६११०१५  


      

I got International Certification

शिक्षक म्हणून समृद्ध होण्याच्या मार्गावरचा आणखी एक यशस्वी टप्पा.जागतिक पातळीवरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा आनंद आपल्या सर्वांसोबत शेअर करताना आनंद वाटतोय. Once agian I got one International Certification in " STRATEGY IN INNOVATION : HOW THE LEADERS OF TOMORROW CREATE THE FUTURE" I Successfuly complited this certification from 'EMERITUS' One of INTERNATIONAL PLATFORM.I am very Happy to connect this Globle network for my future growth.For more information www.shikshanbhakti.in


शिक्षणातील निर्भीड कट्टा

जीवन शिक्षण मार्च २०१८ च्या अंकात आमच्या शाळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम "शिक्षणातील निर्भीड कट्टा " हा लेख प्रसिध्द झाला आहे.काय आहे निर्भीड कट्टा जाणून घ्या लेखातून आणि खालील व्हिडीओ मधून      

https://www.youtube.com/watch?v=-FMDbE6n4ng

I Selected for "National E-Innovation Award 2017"

I am Selected for "National E-Innovation Award 2017". देशातून फक्त ७ व्यक्तींना दिला जाणारा सन्मान मिळतोय हा माझ्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,खूप मोठ्या अडचणींचा समाना करत आपण काम करताना असा एखादा आनंदाचा क्षण येतो आणि आपल्या कामाला खूप मोठे बळ देऊन जातो ,भविष्यातही अशा अनेक अडचणींचा सामना करत राहण्याची जिद्द आपणास यातून मिळते हे सर्व आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठींब्यामुळे करू शकतोय ,हा विश्वास असाच कायम ठेवण्याची शक्ती माझ्यात कायम राहो बस्स इतके अपेक्षित धरून पुढील कामाला लागतो अधिक माहिती साठी www.mifindia.com वर अधिक सविस्तर वाचा ....धन्यवाद .....


Dental Checkup zp school Pulkoti Satara



निर्भीड प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आमच्या जि.प डिजिटल केंद्रशाळा पुळकोटी ता माण जि सातारा येथे दंत तपासणी शिबीर आयोजित केले एकूण ७० मुलांचे दात तपासून डॉ पिसे सर यांनी दात कसे घासावेत याचा डेमो साहित्यासह दाखवला आणि प्रत्येक मुलाला एक ब्रश आणि पेस्ट सुद्धा भेट म्हणून दिली..तुमच्या शाळेत सुद्धा असे शिबीर घेवू शकताTHANKS TO Dr.Chetan Galande.

How to recover deleted all photos just 1minute on mobile















तुमच्या मोबाईल मधील महत्त्वाचे फोटो   डिलीट झाले ? तेही एका वर्षापूर्वीचे ? कितीही वर्षापूर्वीची मोबाईल मधील डिलीट झालेले सर्व फोटो  १ मीनिटात परत मिळाल्यास ?कसे ? shikshanbhakti you tube channel आहे न आपल्या मदतीला .यासाठी खालील लिंकवर क्लिक करून हा व्हिडीओ पहा आणि युट्युब चानेल ला जरूर सबस्क्राईब करा .

Online Test





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.साम टीव्ही ने घेतलेल्या मुलाखतीने मला उर्जा मिळाली . या वाक्यातील विशेषणाचा अर्थ काय ?

विज
प्रेरणा
ताकत
निरुत्साह


2. मला वाटते आपणही उंच आकाशात उडावे . काळ ओळखा .?

भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ
सर्व बरोबर


3. सकाळी सकाळी चिमण्यांची -------------------एकू येते ?

किलबिल
कलकलाट
चिवकाव
कलकल


4.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ------------------------- ?

स्वामी विवेकानंद
कर्मवीर पाटील
शरद पवार
महर्षी कर्वे


5. तुम्ही नक्की शिष्यवृत्ती धारक होणार याचा मला --------------------------येत आहे . योग्य वाकप्रचार ओळखा .

सुगाव
अंदाज
विश्वास
भरोसा


6. मी काल तुम्हाला भेटणार होतो पण जमले नाही . या वाक्यात किती आकारांत शब्द आले आहेत ?

तीन
चार
दोन
पाच


7. वेगळा शब्द ओळखा ?

टेबल .
मळा
वाडा
गाडी


8. राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?

कुसुमाग्रज
गोविंदाग्रज
केशवकुमार
केशवसुत


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. एखाद्याला उद्देशून बोलणे या अर्थाची म्हण कोणती .

बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा
लेकी बोले सूने लागे
डोळ्यात खडा नि कानात फुंकर
आजार म्हशीला आणि लस रेड्याला


11. समाना पाहण्यासाठी माणसांची -----------जमली .?

गर्दी
घोळका
गठ्ठा
समूह


12. --------------sun over our head.which artical of blank space ?

a
the
an
no artical


13. waist- two -out ---- ?

out
good
fast
tank


14. Rahul is good boy. which is the opposite word of adjectiv . ?

bad
nice
cruel
kind


15. which is correct contracted form ?

have'nt
havn't
hvn't
haven't


16. arrange alphabetical which is last word ?

library
changing room
classroom
kitchen


17. which is the fasted media ?

sit email
letter
bird
man


18. एका संख्येच्या सात पटीत १६ मिळवल्यास एक शतक होतात तर ती संख्या कोणती ?

१६
१४
१२
१५


19. २ ६ १ या अंकापासून तयार होणा-या लहानात लहान पाच अमकी संख्येतील सर्व अंकाची बेरीज किती ?

१३
११

१०


20.पावणे तीन वाजता दोन तासाचा पेपर सुटला तर पेपर किती वाजता सुरु झालेला असेल ?br>
१.४५
११.४५
१२.१५
१२.४५


21. ७ च्या पाढ्यात किती मुळ संख्या येतात ?



3
सर्व चूक


22. ११७५ पैसे म्हणजे किती रुपये ?

पावणे बारा रुपये
पावणे अकरा
पावणे दहा
सव्वा अकरा


23. पाच सहस्त्र म्हणजे १० रुपयाच्या किती नोटा ?

५०
५००

५०००


24. अंश समान असतना -------------------तो अपूर्णांक मोठा ?

ज्याचा छेद मोठा
ज्याचा अंश मोठा
ज्याचा अंश लहान
ज्याचा छेद लहान


25. चौरसाच्या चार बाजूच्या बेराजीची तिप्पट ६० असल्यास चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल ?


१०




26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. ३०० भागिले १ बरोबर किती ?

३०
3
३०३
३००


28. सव्वीस हजार सहा अंकात ओळखा ?

२६०६
२६०००६
२६६०६
२६००६


29. उतरता कर्म लावल्यास सर्वत शेवटी ------------------संख्या येते ?

सर्वात लहान
सर्वात मोठी
समान
सांगता येत नाही


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?







31. जमिनीखालील पाण्याच्या साठ्यास --------------------म्हणतात ?

जल
भूजल
पाणी
सर्व बरोबर


32. धरण ----------------------वर बांधतात ?

ओहळ
नदी
केनल
सर्व चूक


33. वाहणा साठी ---------------------इंधन म्हणून वापरतात ?

पाणी
पेट्रोल
विज
लाकडे


34. पीठ चाळून ---------------काढू नये ?

कचरा
कोंढा
पीठ
यापैकी नाही


35. कपडे धुण्याची नैसर्गिक वस्तू कोणती ?

साबण
शिकेकाई
सोडा
पावडर


36. ६०३ , ४५० , २७० गटाशी जुळणारे पद ओळखा ?

२३६
३१५
२५४
२०२


37. ४७ , १७, ३७ ?

५७
६७
२७
७७


38. उत्तरेकडे तोंड असणा-या मुलाच्या डाव्या बाजूच्या कोणती दिशा येईल ?

पश्चिमच्या विरुद्धची
पूर्वच्या विरुद्धची
दक्षिणच्या विरुद्धची
पश्चिम विरुद्धाची


39. १ मार्च ते गांधी जयंती पर्यंत एकूण किती दिवस होतील ?

२२६
२१६
२०६
२२१


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. जन्म दिवसात चार दिवसाचा फरक असणा-या दोन मुलाच्या वयात किती दिवसाचा फारक असेल ?

४ महिने
४ दिवस
४ आठवडे
४ वर्ष


42. इंगजी अक्षरामालेतील मध्यभागी येणा-या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ?

q
S
t
u


43. लीप वर्षात किती महिने असतात ?

११
१२
१३
सर्व बरोबर


44. ६ जूनला रविवार असल्यास पुढील महिन्यात त्याच तारखेला कोणता वर असेल . ?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार


45. सिंहगड हा किल्ला --------------------जिल्ह्यत आहे ?

सातारा
पुणे
रायगड
लातूर


46. शिवरायाचे आजोबा कोण ?

शहाजीराजे
लखुजी जाधव
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. घोरपडे ---------------- ?

फलटण
मुधोळ
जावळी
यापैकी नाही


48. शिवारायचा जन्म -----------------राज्यात झाला ?

कर्नाटक
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
सर्व बरोबर


49. मोहिते शिवाराच्या अष्ट प्रधान मंडळात ----------------- ?

सुमंत
सेनापती
सेनापती
अमात्य


50. शिवरायांनी -----------------------स्वराज्य निर्माण केले ?

न्यायाचे
सर्व बरोबर
समानतेचे
सर्वांचे



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?