बुध्दिमत्ता 50 प्रश्न 16/03/2015


गणित ५० प्रश्नांचा पेपर

बुध्दिमत्ता 50 प्रश्नांचा पेपर 16/03/2015 


संगणक नसलेल्या शाळेतील शिक्षकांने बनवला ऑफलाईन apps
        दप्तराचे ओझे कमी करण्यावर शोधला मार्ग 
  ऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
                 दप्तराचे ओझे यावर सर्वत्र चर्चा, भाषणे होत असताना संगणक नसलेल्या एका जिल्हा परिषेदेच्या शाळेतील संगणकाचे कोणतेही शिक्षण न  घेता जिद्दीच्या जोरावर संपूर्ण एका इयत्तेसाठी दप्तराचे ओझे कमी करणारा मोबाईल apps बनवला जो इंटरनेट शिवाय चालणार . मुलांच्या पाठीवरील व मनावरील ओझे कमी होण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. संगणक किंवा एलसीडी प्रोजेक्टर ला मोबाईल यु एस बी ने जोडून संपूर्ण वर्ग पुस्तकाशिवाय सर्व विषयातील सर्व घटकावर अमर्यादित असा सराव अभ्यास सहज व मनोरंजक पध्दतीने करतील.
                  यामुळे शिक्षकांचा वेळ वाचेल, मुलांना दररोज सर्व पुस्तके पाठीवर आणण्याची आवश्यकता भासणार नाही. खूप मोठ्या प्रमाणावर कागद वाचेल आणी निसर्गाची हानी टळेल. मोठ्या प्रमाणावरील खर्च वाचेल. मुले स्वत:ज्ञान रचनावादी पद्धतीने अध्ययन करू शकतील .वेळ वाचेल , शिक्षकांचा  इतर कामात जाणारा वेळ यामुळे भरून निघेल.
                  हा apps प्रयोग  म्हणून इयत्ता ४ थी च्या सर्व विषयावर आधारित तयार केला आहे. या मध्ये ४ थी च्या सर्व विषयाचा त्यातील प्रत्येक घटकाचा समावेश केला आहे. त्यामध्ये मार्गदर्शिकेत , किंवा स्वाध्यायात नसतील असे स्वनिर्मित सराव प्रश्न विद्यार्थ्यासाठी उपलब्ध केले आहेत .कुठेही भाषणे, चर्चा न  करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्यावर भर देणारा हा शिक्षक बालाजी बाबुराव जाधव जि.प.प्राथ. शाळा शिंदेवस्ती (म्हसवड) ता. माण जि. सातारा या संगणक नसलेल्या शाळेतील शिक्षक आहे. यापूर्वीही त्यांनी www.balajijadhav.in नावाची शैक्षणिक वेबसाईट बनवून ४ थी शिष्यवृत्ती साठी मोफत ऑनलाईन टेस्ट हा प्रयोग  महाराष्ट्रभर प्रसारित केला आजही ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी दररोज त्याचा वापर करतात. सर्व शिक्षकांनी दररोज वापरावी अशी ही शैक्षणिक वेबसाईट आहे. यासाठी ग्रामीण भागात इंटरनेट ची समस्या येवू लागल्याने या प्रयत्नवादी शिक्षकांने इंटरनेट शिवाय चालणारा मोबाईल चा ऑफलाईन apps बनवला . सध्या मराठी शाळा व त्याचे वास्तव यावर सतत उलट चर्चा असतात त्यांच्यासाठी एक ठोस उत्तर या होतकरू शिक्षकाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.आजपर्यंत मराठी शाळासाठी मराठीतून एका मराठी शिक्षकाने केलेला मराठी साठीचा पहिलाच ऑफलाईन apps असेल . सर्व प्रशासन याचा जरूर विचार करून अशा शिक्षकांना प्रेरना देवून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न निश्चित करेल .याबद्दल सर्व स्तरातून या शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.
         साम टीव्हीवर झालेली मुलाखत ०९/०३/२०१५

मी मराठी मुंबई वर्तनपत्राने घेतलेली दखल
सकाळ कोल्हापूर
तरुण भारत सातारा
शालेय सचिव मा. नंदकुमार साहेब (IAS) यांनी आनंदाने कामाची दाखल घेतली

No comments: